ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्ररणधुमाळी

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा समावेश, राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “रिया चक्रवर्तीच्या फोनवर…”

नागपूर | Sushant Singh Rajput Case – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात आदित्य ठाकरेंचा समावेश असल्याचा आरोप राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळेंनी हा गंभीर आरोप केलाय. मात्र, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी राहुल शेवाळेंनी केलेल हे आरोप फेटाळून लावले आहेत. शेवाळेंकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असं आव्हान कायंदेंनी केलं आहे.

“एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं आहे. याबाबच बिहार पोलिसांनी माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे”, असं राहुल शेवाळे म्हणाले.

आज (21 डिसेंबर) लोकसभेमध्ये ड्रग्जसंबंधी चर्चा सुरू आहेत. अनेकांनी या चर्चेत भाग घेतला आहे. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तो विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. मात्र, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेला त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. रियाची ड्रग्जसंबंधात चौकशी करण्यात आली होती. रियाला सुशांतच्या मृत्यूपूर्वी जे कॉल आले होते त्यासंदर्भात बिहारच्या पोलिसांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल एयू या नावानं आले होते. या तपासाच्या टीमने एयूचा अर्थ अनन्या उद्धव असा सांगितला होता. परंतु, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली. सीबीआयनं याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला, असंही राहुल शेवाळेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनिषा कायंदेनी राहुल शेवाळेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळेंना आदित्य ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. एका महिलानं शेवाळे यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. याची दखल अजून कोणीही घेतली नाही, त्याचं काय झालं? त्या महिलेची तक्रार का घेतली जात नाही? राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये