इतरताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यासमोर शेतकरी अक्षरशः रडले

पुणे | पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे एक मुख्य नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याविरुद्ध आज शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून हर्षवर्धन पाटील यांना प्रोजेक्ट केले जात असताना दुसरीकडे त्यांच्याच होम पीचवर त्यांच्याविरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा आक्रोश भाजपच्या विरोधातील जनमत बनत चालल्याची नांदी असल्याचे दिसून येते .

विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात घोषणा देत असताना काही शेतकरी रडले. आमची व्याज चालली. पैसे चालले ….पण आमच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत. हर्षवर्धन पाटील यांची श्रीमंती वाढत चालली पण आम्ही दरिद्री होत चाललो , असा सूर त्यांनी यावेळी लावला.

राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या निरा भिमा सहकारी आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची उसाची बिले दिली नाहीत, त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आत्मक्लेष आंदोलन केले. पदयात्रा काढली तसेच सोलापूर – पुणे हायवे वर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.
कारखाना कार्यस्थळावर देखील आंदोलन झाले.

यावेळी शेतकऱ्यांच्या घोषणा अत्यंत विस्फोटक आणि प्रक्षुद्ध होत्या. एकानंतर एक असे कारखाने – संपत्ती वाढत चालली असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र हर्षवर्धन पाटील पैसे देत नाहीत, असे उद्विग्न उद्गार यावेळी शेतकऱ्यांनी काढले.

अनेक शेतकरी धाय मोकलून रडले. एकीकडे हर्षवर्धन पाटील यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यांचे राजकीय वजन वाढत आहे, त्यांना सत्ताधाऱ्यांकडून अनेक प्रकारची रसद मिळत आहे. परंतु ते सर्व स्वतःच्या स्वार्थांकरता वापरत असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादकांना मात्र पैसे देत नाहीत. आमची बिलं थकली, लाईट बिल वाढली, कर्जाचे हप्ते चालले, आमची त्यांना दया येत नाही का? असा रडवेला सूर येथे अनेक शेतकऱ्यांनी काढला…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये