मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! थायलंडमधील धक्कादायक घटना
थायलंड | थायलंड येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक ४५ वर्षीय महिला नेता सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या महिला नेत्याला तिच्या दत्तक मुलासोबत शारीरिक संबंध ठेवताना तिच्या पतीने रंगेहात पकडले. प्रपापोर्न चोईवाडकोह असे या महिला नेत्याचे नाव आहे. प्रपापोर्नचा मुलगा फक्त २४ वर्षांचा आहे. फ्रा महा असे त्याचे नाव असून त्याचा आणि त्याच्या आईचा शरीर संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर थायलंडच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे. प्रपपोर्नचा पती टीआय याला त्यांच्या अफेअर बाबत संशय होता. पत्नी प्रपापोर्न हीला रंगेहाथ पकडण्यासाठी त्याने तिचा व मुलाचा पाच तासांपेक्षा जास्त वेळ गाडी चालवत पाठलाग देखील केला.
दत्तक मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध
प्रपापोर्न आणि टीआय यांनी फ्रा महा याला दत्तक घेतले होते. प्रपापोर्न या थायलंडच्या राजकारणातील मोठा चेहेरा आहे. त्या येथील बड्या नेत्या आहेत. प्रपापोर्न आणि फ्रा महा या मायलेकाचे गेल्या काही दिवसांपासून अफेअर सुरू होते. प्रपापोर्नने सांगितले की तिला तिच्या कृत्याबद्दल वाईट वाटले. टीआय याने फ्रा महावर पत्नीला फूस लावल्याचा आरोप देखील केला आहे. आई आणि मुलाच्या या व्हिडिओमुळे चीनसोबतच थायलंडमधील लोकांनाही धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी विविधी प्रकारच्या कमेन्ट देखील दिल्या आहेत.
पक्षातून निलंबन…
प्रपापोर्न यांना “मॅडम प्ली” असेही म्हणतात. थायलंडच्या सुखोथाई प्रांतात त्या प्रसिद्ध नेत्या आहेत. त्या सध्या स्थानिक चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा देखील आहेत. गेल्या वर्षी मार्चपासून त्या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्या आहेत. गेल्या मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते पक्षाच्या विविध कार्यक्रमात त्या सक्रिय आहेत. त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाने प्रपापोर्न यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.