ताज्या बातम्यापुणे

चार जूननंतर अजित पवारांना मिश्या काढाव्या लागतील – श्रीनिवास पवार

बारामती | बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला आहे. नणंद विरुद्ध भावजय असा सामना बारामतीत रंगणार असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. अशातच अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागणार आहेत, अशी टीका श्रीनिवास पावर यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात फिरत असलेला एकही जण ४ जूननंतर दिसणार नाही. जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार श्रीनिवास पवार यांनी घेतला आहे. श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप देखील केला आहे. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज आहे. माझा मुलगा मला जेवढा प्रिय आहे तेवढेच दीरही प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले असून या संघर्षामुळे त्या अजित पवार यांचे बारामती येथील घर सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजितदादांच्या भूमिकेमुळे त्यांची साथ सोडली असल्याचे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये