BREAKING NEWS : नवले ब्रिज येथे भिषण अपघात; टॅंकरने 40 ते 50 गाड्यांना दिली धडक, पहा व्हिडीओ
पुणे : भरधाव टँकरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने नवले ब्रिजवर ((Pune Navale Bridge Accident) आज रविवारी साडे आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात भरधाव टँकरने समोरील गाड्यांना धडक दिल्याने सुमारे 40 हुन अधिक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. या अपघातात सध्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकजण जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाच्या 2 रेकसू व्हॅन घटनास्थळी दाखल झाले असून अडकलेल्या गाड्या काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. (terrible accident at navale bridge pune mumbai haighway)
मिळालेल्या माहितीनुसार एक भरधाव टँकर कात्रजकडून नवले ब्रिज मार्गावरून जात होता. नवले ब्रिजच्या उतारावर टँकर आला असता अचानक ब्रेक निकामी झाल्याने टँकर समोरील गाड्यांना जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत पुढे जात असलेल्या गाड्या एकमेकांना आढळत गेल्या. या भीषण अपघातात सुमारे 40 हुन अधिक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. यामध्ये अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकजण जखमी सुद्धा झाले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की, काही गाड्या चकणाचुर झाले आहेत. तर यामध्ये काही जण गंभीर जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
या दरम्यान नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली असून अनेक गाड्या रोडच्या मधोमध अडकले आहेत.
घटनास्थळी अग्निशामक दलाचे 2 रेक्श्यु व्हॅन दाखल झाले असून अडकलेल्या गड्य्या बाजूला काढण्याचे कामे सुरु करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलिसांचा सुद्धा मोठी कुवत बोलाविण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीने मदतकार्य सुरु आहे.