ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

कोश्यारींच्या शिवरायांबाबत केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले; “मी अनेक राज्यपाल बघितले. मात्र,…”

मुंबई : (Aaditya Thackeray On Bhagarsinh Koshyari) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. राज्यापालांच्या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी केली आहे.

“राज्यापालांचे हे पहिले वक्तव्य नाही. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराजांबाबत एकेरी उल्लेख केला होता. महात्मा फुलेंबाबतही त्यांनी अशाच प्रकारचे विधान केले होते. हे जाणून बुजून होत आहे, की यामागे त्यांचा काही हेतू आहे, हे तपासले पाहिजे. तसेच त्यांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे आणि पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी त्यांना पदमुक्त केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, “एकंदरितच महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. मग ते राज्यातून बाहेर केलेले प्रकल्प असतील किंवा शेतकऱ्यांसाठी जाहीर न झालेला ओला दुष्काळ असेल, आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत राज्यापालांनी असं विधान करणं हे कधीही अपेक्षित नव्हते. मी अनेक राज्यपाल बघितले. मात्र, कधीही असे राजकीय राज्यपाल बघितले नाही”, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये