Top 5इतरताज्या बातम्यादेश - विदेशफिचरसक्सेस स्टोरीस्मार्ट उद्योजक

बाबो ! बाप-लेकानं प्लास्टिक कचऱ्यापासून उभी केली कोट्यवधीची कंपनी…

तामिळनाडू : तामिळनाडू येथील बाप-लेकाची जोडी श्री रोंगा पॉलिमर आणि इकोलाईन कंपनी चालवते. या कंपनीने प्लास्टिक कचरा जमा करून त्यापासून कपडे तयार करण्याचे काम सुरू केले. शंकर आणि त्यांचा मुलगा सेंथील शंकर यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून इको फ्रेण्डली कपडे तयार करून सर्वांना आश्चर्यचकीत केले. यांची कंपनी पीईटी प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करून त्यापासून जॅकेट, टी शर्ट, ब्लेझर सह अन्य कपड्यांचे उत्पादन करते. अशी ही ब्रँड स्टोरी आहे.

श्री रोंगा पॉलिमर आणि इकोलाईन कंपनी चालवत असताना ते ज्या रस्त्याने जात होते तो तेवढा सोपा नव्हता. शंकर यांनी सांगितलं की, त्यांनी विदेशात तीन दशकं घालवली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि २००८ मध्ये त्यांनी श्री रेंगा पॉलिमर कंपनीची स्थापना केली. ही कंपनी पीईटी भारतात बॉटल रिसायकल करते. पर्यावरणातील प्लास्टिक आणि त्यामुळे होणारे प्रदूषण ते थोड्या प्रमाणात कमी करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी ही कंपनी सुरु केली. त्यापासून टिकाऊ कपडे तयार करणे. कंपनीची वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपये आहे. कंपनी आपले उत्पादन मजबूत बनवण्यासाठी जर्मन टेक्नॉलॉजीचा उपयोग करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये या कंपनीने तयार केलेले जॅकेट वापरले. तेव्हापासून ही कंपनी प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हिरोशिमा येथे झालेल्या जी – ७ शिखर संमेलनात इकोलाईनचे जॅकेट वापरले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये