इतरक्राईमताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

“पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही”, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे | Ajit Pawar – विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे (Pune) शहरात आज (27 जून) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरूणीवर भरदिवसा कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी घटनेवर भाष्य करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी प्रशासनावरही ताशेरे ओढले.

अजित पवार यांनी ट्विट करत या घटनेवर भाष्य केलं आहे. “विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो”, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार सदाशिव पेठेतील पोलीस चौकीजवळ घडला आहे. प्रेम संबंधास नकार दिल्यामुळे तरूणीवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरूणी जखमी झाली असून तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच हल्ला केलेल्या आरोपी तरूणाला नागरिकांनी पाठलाग करत पकडले. तर या तरूणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये