टेस्टी आणि क्रिएटिव्ह केकचा नवीन स्टार्ट अप
आजकाल प्रत्येक उत्सव केक कापून साजरा करण्याची पद्धत आहे. जन्मदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस किंवा कशाचा वर्धापनदिन, अशा वेळी लोक केक आणून उत्साहात दिवस साजरा करतात. अशा वेळी कापण्यासाठी आणलेला केक सगळ्यात महत्वाचं आकर्षण असतं. साजरीकरणासाठी आणलेला केक किती आकर्षक आहे, त्यावरून कार्यक्रम किती लक्षणीय होईल याचा अंदाज सहसा लावला जातो. त्यामुळे आकर्षक केक सर्वांनाच हवे असतात. मात्र, बाजारात उपलब्ध असलेले केक हे सारखेच असतात. त्यात आकर्षक असं जास्त काही आढळून येत नाही. आणि लोकांना उपलब्ध असलेल्यांपैकीच एक निवडावा लागतो.
हेच लक्षात घेऊन पुण्यातील अदिती भावे यांनी एक शक्कल लढवली आणि लोकांची गरज बघून स्वतः घरीच अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने केक बनवायला सुरुवात केली. त्यातून एक चांगला व्यवसायदेखील उभा राहिला.
अदिती भावे यांना डाएटबद्दल योग्य माहिती आहे. त्याचबरोबर क्रिएटिव्ह गोष्टींत त्या पूर्वीपासूनच उत्साहित असतात. त्यामुळे २०२० पासून त्यांनी घरी केक तयार करायला सुरुवात केली. ‘डाइव्ह इन डेझर्ट्स’ नावाच्या ब्रँडमधून त्यांनी स्वतःच्या केकची वेगळी ओळख लोकांना करून दिली. सध्या त्यांच्याकडे मिळणाऱ्या चीज केकला पुण्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नवनवीन ट्रेंड्सच्या संबंधित त्यांच्याकडे क्रिएटिव्ह पद्धतीने तयार केलेले केक हमखास उपलब्ध असतात. त्यांच्या ‘डाइव्ह इन डेझर्ट्स’ या फेसबुक पानावरून लोक त्यांच्याकडून केकची मागणी करतात. त्यानुसार घरपोच ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांच्याकडे स्मॉल, मीडिअम आणि लार्ज अशा तीन आकारांचे केक उपलब्ध असतात. त्यात तब्बल १५ फ्लेवर उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या उत्सवांत हे केक कापता येतात.
अदिती या घरी केक तयार करत असल्या, तरी त्यांच्या केकची चव ही कोणीही लगेच ओळखू शकेल अशीच असते. त्यांच्या केकला कोणत्याही जाहिरातीशिवाय मागणी वाढत आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे केकची लाजवाब चव, जबरदस्त क्रिएटिव्हिटी.