ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

महाराष्ट्रानंतर भाजपचं ऑपरेशन लोटस झारखंड सरकार पाडणार? ; मुख्यमंत्री सोरेन म्हणाले…

रांची : (Hemant Suren On Central Government)भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ऑपरेशन लोटस करत गेल्या आठ वर्षात देशातील आठ राज्यांमधील सरकारे पाडली आहेत. दोन महिन्यापुर्वीच राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आता झारखंडमधील महागठबंधन सरकार धोक्यात आलं आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी महागठबंधन मधील सर्व आमदारांना रांचीवरून आता थेट काॅंग्रेसशाशित राज्य असलेल्या राजस्थानच्या राजधानी रायपूरला हलवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री स्वत: या प्रत्येक बारीक राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. यावेळी ते म्हणाले, आम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार असून राज्य सरकारला कोणताही धोका नाही.  

केंद्रातील भाजप सरकार देशातील सर्व राज्यामधील सरकारे पाडण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थीतीत देशाचं भवितव्य काय असेल याचा अंदाज करा असं सांगत हेमंत सोरेन म्हणाले की, मला सत्ता कोणाच्या उपकाराने मिळाली नसून सव्वा तीन कोटी आदिवासींनी मला निवडून दिलं आहे. भाजप आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असून यासाठी त्यांच्याकडून घोडेबाजार करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये