‘मशाल’सह ठाकरे गट अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सज्ज, ऋतूजा लटके गुरुवारी अर्ज दाखल करणार!
मुंबई : (Rituja Latke will file the application on Thursday) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मशाल या निवडणूक चिन्हासह अंधेरी-पुर्व पोटनिवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यासाठी स्थानिक शिवसैनिक हातात मशाल घेऊन प्रचारासाठी सज्ज झाले आहेत.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता हो वाद अंधेरी पुर्व निवडणूक आनखी चव्हाट्यावर येणार आहे. शिवसेनेकडून दिवांगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांना उमेदवारी दिली असून त्या गुरुवार दि. 13 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
सत्तासंघर्षानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे, त्यामुळे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सर्व ताकत पणाला लावणार आहेत.
11 Comments