ताज्या बातम्यारणधुमाळी

“खोके सरकारने एका महिलेला…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | Aditya Thackeray On Shinde Government – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा BMC कडून मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र पालिकेनं लटके यांना दिलं आहे. त्यामुळे आज दुपारी 12 च्या सुमारास लटके या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तसंच लटकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिंदे सरकारवर (Shinde Government) टीकास्त्र सोडलं.

“आज प्रत्येकाच्या मनात दु:ख आहे. अशावेळी समोरून कुणीही लढत नसतं. परंतु खोके सरकारनं एका महिलेला सतावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचं काळं मन समोर आलेलं आहे. त्यामुळे आता माणुसकी विरूद्ध खोके सरकार, अशी लढाई सुरू झाली आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं काल (13 ऑक्टोबर) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या, असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. या परिस्थितीत आम्हाला हस्तेक्षेप करावा लागत आहे, अशी टिप्पणीही हाकोर्टानं निर्णय देताना केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेनं आज सकाळीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर मंजूर केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये