ताज्या बातम्यापुणे

रोहित पवारांना मोठा धक्का; कट्टर समर्थकाचा अजित पवार गटात पक्षप्रवेश

पुणे | बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मानाचं पान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला शरद पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले भूषणसिंहराजे होळकर यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश देत थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

अक्षय शिंदे हे मूळचे चौंडी येथील असून रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांना कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता.

अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर आणि एकूणच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहित पवार यांचे समर्थक बऱ्यापैकी राम शिंदे यांच्याकडे गेल्याचं अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी अक्षय शिंदे हे रोहित पवार यांच्या सोबतच होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये