पुणेसिटी अपडेट्स

रोटरी क्लबच्या दांडियाचा महिलांनी घेतला लाभ

इंदापूर : रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित “दांडिया जल्लोष” या कार्यक्रमाला शहरातील हजारो महिलांनी उपस्थिती लावत दांडियाचा आनंद लुटला. दांडिया उत्सवात महिलांसह पुरुषांनी देखील दांडियाचा आनंद लुटला. यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, अध्यक्ष नरेंद्र गांधी, सचिव सुनील मोहिते, खजिनदार नितीन शहा, माजी अध्यक्ष उदय शहा, माजी सचिव भीमाशंकर जाधव, संजय दोशी, महेंद्र रेडके, ज्ञानदेव डोंबाळे, नंदकुमार गुजर, प्रशांत शिताप, आझाद पटेल, राकेश गानबोटे, धरमचंद लोढा, वसंतराव मालुंजकर, मोरेश्वर कोकरे, प्रमोद भंडारी, अमर गायकवाड, सागर शिंदे यांचेसह सर्व पदाधिकारी व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमाबाबत बोलताना रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी १०० कोटी रुपयांचे सामाजिक उपक्रम सक्रियपणे राबविले जातात. जागतिक स्तरावर पोलिओ लसीकरणासाठी तर अब्जावधी रुपये दरवर्षी रोटरी खर्च करत असते.

रोटरीच्या माध्यमातून दरवर्षी उत्कृष्ठ प्रोजेक्ट राबविले त्याची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेतली जाते. यामुळे चांगले सामाजिक वातावरण निर्माण होत असते. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लबच्या दांडिया महोत्सवास भरभरून प्रतिसाद मिळाल्याने समाधान वाटते. या दांडिया जल्लोष कार्यक्रमास नेचर डिलाईटचे मिलिंद कौलगी, शहा ब्रदर्सचे भरत शहा, भगवान भरणे पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भरणे, गांधी सराफचे तन्मय गांधी, व्ही.डी. कॅन्सल्टंटचे रोहन मालुंजकर, मे. लिलाचंद दलुचंद शहाचे नितीन शहा, मे. चंद्रकांत स्वरूपचंद शहाचे इशान दोशी, हॉटेल शिवराजचे समीर सूर्यवंशी, हॉटेल माऊली प्रसादचे प्रवीण सूर्यवंशी, साई केबल व्हिजनचे अस्लम शेख, अमीर इनामदार, भरणे मोटर्सचे अमरजित भरणे, अशोक क्लॉथ स्टोअर्सचे राकेश गानबोटे, मे. महाराष्ट्र एजन्सीचे तुषार गुजर, मे. शहा उत्तमदास मगनदासचे उदय शहा, डोंबाळे प्लायवुडचे ज्ञानदेव डोंबाळे, जे.के. जगताप आणि कंपनीचे राजेंद्र जगताप, विराज जगताप, इजगुडे पेट्रोलियमचे अजिंक्य इजगुडे, मिडास टचचे हरिदास गवळी, बेकर्स ब्राऊनचे विशाल बोराटे, व्यंकटेश फार्माचे मिलिंद कवितके, माऊली ज्वेलर्सचे तुकाराम बानकर, स्मिअर लॅबचे डॉ. मेघा अडसूळ, ज्ञानेश्वर ज्वलर्सचे संजय बानकर, चैतन्य बानकर, श्री बानकर ज्वेलर्सचे श्रीनिवास बानकर तसेच सह्याद्री आटो, सजनी डिझायनर, सागर फर्निचर, पंचकृष्णा मोबाइल, डीएस वाशिंबेकर सराफ यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये