ताज्या बातम्यारणधुमाळी

ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळाला नाही तर शिवसेनेचा ‘प्लान बी’ तयार, ‘या’ 3 नावांचा विचार सुरू

मुंबई | Andheri East Bypoll – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्यानं त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ठाकरे गटानं (Thackeray Group) कोर्टात धाव घेतली असून यावर आज (13 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. मात्र, जर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर पुढे काय? याचा ‘प्लान बी’ देखील ठाकरे गटाकडून तयार करण्यात आलेला आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्यानं ठाकरे गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण राजीनामा मंजूर झाला नाही तर मग ठाकरे गटाचा पुढचा प्लान काय असणार? कोणाला उमेदवारी मिळणार? यासाठी ठाकरे गटानं ‘प्लान बी’ तयार केला आहे. ठाकरे गटाकडून तीन पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यामधील पहिलं नाव संदीप (राजू) नाईक हे आहे. हे प्रभाग 81 चे नगरसेवक आहेत. तसंच दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. ठाकरे गटाकडून त्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

तसंच ठाकरे गटानं आणखी दोन पर्याय ठेवल्याची माहिती मिळत आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणाचा निवाडा झाला नाही तर त्यांच्या सासुबाई आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या मातोश्री यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर रमेश लटके यांच्या बंधूंच्या नावाच्या पर्यायाचाही विचार सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये