ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“…तर मग हे कसलं प्रशासन”, इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

रायगड | Irshalgad Landslide – काल (19 जुलै) रात्री खालापूरजवळील इर्शाळगडाच्या (Irshalgad) पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामध्ये शंभरहून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी मध्यरात्री दरड कोसळ्याचे बोलले जात आहे. या दुर्घेटनेत जवळपास 12 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही या दुर्घटनेनंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कारभारवार प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.”

“खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा”, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये