ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं ‘हे’ आवाहन!

मुंबई | Ganesh Utsav 2022 – सध्या राज्यात गणोशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घरोघरी गणपती बाप्पाचं भक्तीभावाने आगमन होत आहे. तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचं आवाहन केलं आहे.

“राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज्यातील गणेश भक्तांना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं आहे. यावेळी ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे. त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून कायम असणारं कोरोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे आपण यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो.”

पुढे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, गेली दोन वर्षात आपण कोरोना साथीमुळं गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करु शकलो नाहीत. पण या वर्षी सर्वत्र गणेश उत्सव भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, उत्पादन आणि वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो की, या प्लास्टिकमुळं होणार प्रदूषण थांबवण्यासाठी आपण निश्चय करुयात आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करुयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये