ताज्या बातम्यादेश - विदेश

… अन् चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा; वाचा सविस्तर

नवी दिल्ली। Viral Video। गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकच्या( Election) पार्श्वभूमीवर सभा घेत असल्याचं पहायला मिळत आहे. तर उद्या (१२ नोव्हेंबर) ला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात प्रचार जोरदार चालू आहे. एका बाजूला भाजपनं (Bjp) सत्ता कायम राह्ण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं भाजपाला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ (viral video० सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तर हा व्हिडीओ नक्की क्या आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हिमाचल प्रदेशमधील कांग्रा भागात प्रचार करत असून यादरम्यान, पंतप्रधानांनी एका रुग्णवाहिकेसाठी आपला ताफा थांबवल्याचा व्हिडीओ पहायला मिळत आहे. चांबी परिसरात झालेल्या प्रचारसभेसाठी मोदीजी आले होते सभा संपल्यावर मोदींचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने रवाना होत असताना वाटेतचं एक रुग्णवाहिका या ताफ्याच्या मार्गात आली. यावेळी नरेंद्र मोदींचा ताफा थांबवण्यात आला आणि रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यात आला. काही क्षणात रस्ता मोकळा होताच वेगाने ही रुग्णवाहिका समोरच्या रस्त्यावरून निघून गेली त्यानंतरच मोदींचा ताफा आपल्या निश्चित स्थळाच्या दिशेने रवाना झाला. असा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी मोदीजींनी सुंदरनगर आणि सोलन या भागामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा केल्या होत्या. त्या प्रचारसभांमधून विरोधकांवर जोरदार टीका केल्याचं चित्र पाहायला मिळालं होत. यामुळे आता हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुक कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये