ताज्या बातम्यामनोरंजन

“नव्या वर्षात सगळी secrets उलगडतील…”, स्वप्नील जोशीची पोस्ट चर्चेत

मुंबई | Swwapnil Joshi – मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा चाहतावर्ग लाखोंच्या संख्येत आहे. तसंच तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता देखील स्वप्नीलनं एक खास पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

स्वप्नील जोशीचा ‘वाळवी’ (Vaalvi) हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच संदर्भातली एक पोस्ट स्वप्नीलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. स्वप्नीलनं आपल्या इन्स्टाग्रामवर वाळवीचा नवीन टीझर पोस्ट केला आहे. ज्यात दिसत आहे की त्याच्या एका हातात पिझ्झा आहे तर एका हातात फावडा. आता हे नक्की चाललंय काय? स्वप्नीलचं काही कळेना. त्यानं पिझ्झा खाताना फावडा का पकडलाय…नेमकं त्याला करायचंय काय…असे अनेक प्रश्न स्वप्नीलला चाहते विचारत आहेत. तसंच त्याच्या या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

स्वप्नीलनं शेअर केलेल्या या पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, “एका हातात पिझ्झा, दुसऱ्या हातात फावडं…स्वप्नील जोशी सोबत नेमकं घडतंय काय? नव्या वर्षात सगळी secrets उलगडतील…वाळवी 13 जानेवारी 2023 पासून प्रदर्शित..”, अशी ही पोस्ट असून त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, ‘वाळवी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांनी केलं आहे. तसंच या चित्रपटात स्वप्नील जोशी सोबत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसंच वाळवी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये