ताज्या बातम्यामनोरंजन

गौरी खान अडचणीत; ईडी पाठवणार समन्स, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Gauri Khan | किंग खान अर्थातच शाहरूख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) अडचणीत सापडली आहे. लवकरच ईडी गौरी खानला समन्स पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी खानचं नाव आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात गौरी विरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

बँकांना आणि गुंतवणूकदारांना 30 कोटींहून अधिक रूपयांचा गंडा घालणाऱ्या रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यात गौरी खानचं नाव आलं आहे. त्यामुळे ईडी तिला समन्स पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे.

तुलसियानी ग्रुपने गौरी खानला कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनवली होती. त्यामुळे तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरी खानचाही समावेश आहे. या घोटाळा प्रकरणात गौरीचं नाव आल्यानं ईडी तिची देखील चौकशी करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुलसियानी ग्रुपने गौरी खानला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी किती पैसे दिले होते? त्यासाठी काही करार झाला होता का? या सर्व गोष्टींचा शोध ईडीचे अधिकारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये