शहरातील ‘या’ बड्या खाजगी रुग्णालयांकडून नियमांचा भंग; आरोग्य विभागाकडून कारणे दाखवची नोटीस
पुणे | जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांची मनमानी सुरू असल्याचे आज आरोग्य विभागाच्या पथकाने अचानक दिलेल्या भेटीतून समोर आले आहे. शहरात सात मोठ्या रुग्णालयांनी नर्सिंग होम अॅक्ट आणि इतर नियम भंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता आरोग्य विभागाने कारण दाखवा, अशा नोटीसही बजावल्या आहेत.
सर्वसामान्य रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळत असलेल्या या खाजगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिक, जहांगीर हॉस्पिटल, हीलिंग हँड्स क्लिनिक, केईएम हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, गुप्ते हॉस्पिटल, सिद्धी हॉस्पिटल व लॅप्रोस्कोपिक सेंटर यांना आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या नियमांखाली बजावली नाटीस
महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा १९४९ आणि नियम २०२१, गर्भधारणापूर्व तपासणी कायदा १९९४, वैद्यकीय गर्भपात कायदा २०२१, आसिस्टेड रिप्रा डक्टिव्ह टेक्नालाजी तंत्रज्ञान २०२१ आणि सरोगसी (नियमन) कायदा, २०२१. तसेच, जैववैद्यकीय कचरा नियम २०१६, संसर्ग नियंत्रण व प्रदूषण नियंत्रण तसेच आरोग्य सुविधा नियंत्रित करणाऱ्या इतर नियमांसह अग्निशमन नियमांचे पालन करण्यासाठी रुग्णालयांची तपासणी करून नाटीस बजावली आहे.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून आराग्य विभागाकडे अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर पाहणी केली असता अनेक रुग्णालये नर्सिंग होम अॅक्टच्या अनेक तरतुदींचे पालन करत नाहीत. सर्व रुग्णालयांनी नियमांचे पालन करावे आणि रुग्णांना चांगले उपचार मिळावेत हा या मोहिमेचा उद्देश आहे. ज्या रुग्णालयांनी नाटिशीला उत्तर दिले त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- डॉ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ