ताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण आज पार पडणार, अवघड गारमाथा घाटही पार केला

पुणे : (Ashadhi Wari 2023 Sant Eknath Maharaj Palkhi Ringan) संत एकनाथ महाराजांची पालखी मुक्काम दर मुक्काम करत शुक्रवारी (दि. 16 रोजी) गारमाथ घाट हजारो वारकऱ्यांनी भक्तीभावाने सर केला. हा दिपमय क्षण आपल्या नजरेत साठवून ठेवण्यासाठी परिसरातील हजारो नागरीकांनी या सोहाळ्याला उपस्थिती लावली होती. सहावा मुक्काम हा रायमोह या गावी झाली. दरम्यान, आज शनिवार (दि. 17 जून) रोजी पालखीतील आनंदमय क्षण समोर आली आहे.

दरम्यान हा मुक्काम संपवून शुक्रवारी पालखी सातव्या मुक्कामासाठी सकाळी प्रस्थान झाली. तर 425 वर्षाची परंपरा असलेल्या हाटकरवाडी या पंचक्रोशीत सकाळी दहा वाजता पालखी दाखल झाली. यावेळी ग्रामस्थाने नाथांच्या पवित्र पादुकांचे पूजन केले. सोहळ्यातील मानकरी यासह वारकऱ्यांचे भव्य स्वागत देखील करण्यात आले. आज संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण सोहळा आज घुमरे पारगाव या ठिकाणी पार पडणार आहे.

तर पुढील प्रस्थानसाठी बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरातील गारमाथा डोंगरघाटाचा टप्पा हाटकरवाडी येथील नागरिकांच्या उपस्थितीत पार करण्यात आला. यावेळी नाथभक्ताने प्रथेनुसार एक दिवस उपास ठेवला. तसेच या पंचक्रोशीतील तरुणांनी पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांना विना बैलाच्या बैलगाडीत बसून काही वेळातच गारमाथा डोंगर पार करुन दिला.

या डोंगराच्या चौकामध्ये भाविकाच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्याचा विसावा घेऊन सोहळ्यातील सहभाग वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर सातव्या मुक्कामासाठी तांबा राजुरी मार्ग पाटोदा येथे सोहळा वाजत गाजत मार्गस्थ झाला आहे. दरम्यान संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे रिंगण घुमरे पारगाव या ठिकाणी आज शनिवारी (17 जून) दुपारी संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये