मुंबई | CM Eknath Shinde – आज (19 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होत आहे. तसंच आता बीकेसी मैदानावर (BKC Ground) त्यांची सभा पार पडत आहे. या सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोदींचं कौतुक करत महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र सोडलं आहे.
“काही लोकांची इच्छा होती की हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नये. पण नियतीसमोर कोणाचंच चालत नाही. आमची, महाराष्ट्राची आणि मुंबईकरांची इच्छा होती म्हणूनच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज येथे उपस्थित आहेत”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचं लोकर्पण मोदी साहेबांच्या हस्ते राज्याची उपराजधानी नागपूर येथे झालं. तसंच आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतोय. वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्वाचा अभिमान या दोघांच्या विचारांचा पाया होता. मुंबईकरांच्यावतीनं पंतप्रधानांचं स्वागत करतो. आमच्या निमंत्रणाचा ते मान ठेवून आले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही मुंबईत 400 किमींचे काँक्रिटचे रस्ते तयार करत आहोत. त्याचंही भूमिपूजन मोदीजी आज करणार आहेत. आम्ही रस्ते बांधतोय त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायला लागलंय. संपूर्ण मुंबई पुढच्या दोन अडीच वर्षात खड्डेमुक्त होईल. त्यामुळे लोकांचं जीवन सुसह्य होईल. मात्र, यामध्ये काही लोक खोडा घालण्याचं काम करत आहेत. पण त्यांना त्यांचं काम करुद्या आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करु. जे दरवर्षी खड्ड्यातून प्रवास करत आहेत आणि जे लोक खड्ड्यातून कमविण्याचं काम करत होते, त्यांनाच हे काम नको होतं. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पाढंरं करणाऱ्यांची दुकानं आता बंद होणार आहेत, हे विरोधकांचं दुःख आहे”, असं टीकास्त्रही एकनाथ शिंदेंनी सोडलं.