Back To Nature : तणावमुक्त राहायचे आहे, तर करा हे उपाय

धावपळीच्या जगात जगत असताना दररोजच्या सुख-दुःखामध्ये मनाप्रमाणे जगणे राहून जाते. छोट्या- मोठ्या गोष्टींचा ताण-तणाव हा प्रत्येकाला असतोच. अनेक लोक म्हणतात, आज मला फार स्ट्रेस आला आहे. म्हणजे तणाव आला आहे. मग हा तणाव दूर करून आपण आपल्या रोजच्या जगण्यात उत्साह कसा निर्माण करू शकतो? त्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो, हे आपण जाणून घेणार आहोत. तणावात राहिल्याने आपल्या शरीरावर, मानसिकतेवर अनेक दुष्परिणाम होत असतात.

त्याने तुमची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता कमी होते आणि परफॉर्मन्सवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. नक्की आपल्याला तणाव कुठल्या गोष्टींचा येतो? तर यामध्ये एखाद्या वैयक्तिक कारणावरून येऊ शकतो, ऑफिस किंवा व्यावसायिक कारणामुळे किंवा अगदी एखादी डिस्टर्ब करणारी बातमी मिळाल्यानेसुद्धा. कारण तणाव ही आपल्या मनाचीच एक अवस्था असते त्याला फक्त तुम्हीच ठीक करू शकता.

तर तणाव दूर करण्यासाठी नक्की कोणते उपाय करायचे? यामध्ये आपण सुरुवातीला सकाळी लवकर उठून व्यायाम, योगा केला पाहिजे, यामुळे दिवसभर आपणाला आनंदी आणि प्रसन्न वाटते. तसेच आपल्या दिवसभराच्या कामाचे व्यवस्थापन नीट करा. वेळापत्रक तयार करा, त्यानुसार सगळी कामे पूर्ण करा. नियमित आणि एक एक काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल, सकारात्मकता येईल.

ताणतणावामुळे बऱ्याचदा आत्मविश्वास डळमळीत होतो. जगण्यात रस वाटत नाही. काही करण्याची इच्छासुद्धा राहत नाही. अशा वेळी मित्र, मैत्रिणीला भेटा जो तुमचा आदर करतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो एवढेच नाही तर योग्य त्या वेळी तुमची प्रशंसासुद्धा करतो.अशा लोकांच्यात राहिल्याने मोटिव्हेट व्हाल.यामुळे तुमच्या आतमधला आत्मविश्वासपण वाढण्यास मदत होईल.

त्याबरोबर सगळ्या गुणकारी म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या, तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टी करा. यामध्ये अगदी डान्स, चित्रकला, गाणी असे छंद जोपासा. त्यात काही वेळ मन रमवून ताजेतवाने होऊन कामाला लागा. या सर्व गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला तणावमुक्त अनुभवाल.

Dnyaneshwar: