नवी दिल्ली | Nasal Vaccine Price – देशातलं कोरोना (Corona Virus) संकट निवळत चाललं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या जीवघेण्या व्हायरसचं संकट घोंगावू लागलंय. चीन आणि पूर्व आशियामध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची ही वाढती रूग्णसंख्या बघता केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. अशातच मागील आठवड्यात भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही लस लवकरच बाजारात विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. तसंच या लसीची किंमत देखील निश्चीत झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लसीची किंमत एक हजार रुपये असणार आहे. यामध्ये 800 रूपये लसीची किंमत आणि 200 रुपये जीएसटी आणि रुग्णालयाचे चार्ज असणर आहेत.
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं भारत बायोटेकच्या इंट्रानेजल वॅक्सीन (iNCOVACC) कोरोना लसीला बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापराला मंजुरी दिली आहे. इंट्रानेजल वॅक्सीन, कोवॅक्सीन (Covaxin) आणि कोव्हिशिल्ड (Covishield) लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांना बूस्टर डोस म्हणून परवानगी देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही लस जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागिरकांना उपलब्ध होणार आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयात कोरोना लसीच्या एका डोसला 150 रुपये दर आकारण्याची परवानगी दिली आहे. तसंच ही रक्कम जोडून कोरोना लसीची किंमत हजार रुपये होण्याची शक्यता आहे. सेंट लुईस येथील वॉश्गिंटन विद्यापीठात नेझल कोरोनो वॅक्सिन विकसीत करण्यात आली आहे. या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना घेता येईल. सर्वात आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होणार आहे.