केंद्र सरकारचा मोठा निर्णय! चीनसह ‘या’ देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य

नवी दिल्ली | RT-PCR Test Mandatory For Arrivals In India – देशातलं कोरोना (Corona Virus) संकट निवळत चाललं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या जीवघेण्या व्हायरसचं संकट घोंगावू लागलंय. चीन आणि पूर्व आशियामध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरातला हा वाढता कोरोना संसर्ग पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारनं परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.

दरम्यान, आज (24 डिसेंबर) भारतात 201 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तसंच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवीन आकडेवारी जारी केली आहे. देशात आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Sumitra nalawade: