मुंबई | Sanjay Raut On Narayan Rane – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. “26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण मी जपून ठेवलं आहे. संजय राऊतला पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार”, असा इशारा नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, “नारायण राणे यांच्यासारखे आम्ही पळपुटे नाही. आम्ही ईडीची नोटीस (ED Notice) येते म्हणून पळून जाणारे नाही. नारायण राणेंची आर्थिक प्रकरणं काढली तर ते 50 वर्षे सुटणार नाहीत,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
“नारायण राणेंवर मी अजून काहीच बोललेलो नाही. तुम्ही जर धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या. झाकली मूठ सव्वा लाखाची, माझ्या नादाला लागू नका. पक्षासाठी मी हिंमतीनं जेलमध्ये गेलो आहे. तुमच्या हातात न्यायालय, कायदा आहे का? मला जेलमध्ये कसं घालणार,” असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.
“मला जेलमध्ये कोण कोण घालणार आणि काय काय बोलत आहेत याची सगळी नोंद तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पाठवली आहे. नारायण राणेंची आर्थिक प्रकरणं काढली तर ते 50 वर्षे सुटणार नाहीत”, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
View Comments (0)