मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत निधीत घोटाळा केल्याचे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. या प्रकरणात किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर संजय राऊत यांनी “बाप बेटे जेल जायेंगे..” अशी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.