शिंदे गटाला ना तळपता सूर्य ना पिंपळाचं झाड, मिळाला ढाल-तलवारीचा आधार

eknath shinde 4eknath shinde 4

मुंबई | Shinde Group Party Symbol – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचं निर्देश दिले. त्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगानं शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आले होते. त्यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड यांचा समावेश होता. यामध्ये आता निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल-तलवार हे पक्षचिन्ह देण्यात आलं आहे.

ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेनं तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देण्यात आलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि त्यामध्ये ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटानं पहिल्या पसंतीस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगानं हे चिन्ह नाकारलं. कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण उगवता सूर्य हे डीएमके पक्षाचं चिन्ह आहे. त्याचबरोबर झोराम नॅशनल पक्षाचं देखील उगवता सूर्य हे चिन्ह आहे. 

Sumitra nalawade:
whatsapp
line