“ईडी निवडक लोकांना अटक करते यात शंका नाही पण संजय राऊत…”, अंजली दमानियांचं टीकास्त्र

मुंबई | Anjali Damania On Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. जामिनावर तुरूंगातून बाहेर येताच संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक होती हे आता त्यांना कळेल”, असं राऊतांनी म्हटलं आहे. तसंच राऊतांच्या सुटकेनंतर ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण दिसत आहे. यादरम्यान, पत्राचाळ घोटाळा आणि त्यासंदर्भात भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

“ईडी निवडक लोकांना अटक करते ह्यात काहीच शंका नाही. मुख्य आरोपींना अटक न करता ईडीनं मर्जीच्या आरोपींना अटक केली, ह्यातही शंका नाही. ईडीचा सर्रास गैरवापर होतोय. पण संजय राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही”, असं अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीनं आता संजय राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी करत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा पत्राचाळ घोटाळ्यात सहभाग होता की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना अंजली दमानियांनी त्यासंदर्भात ट्वीट करून संजय राऊतांवर टीका केली आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)