प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा; विश्व वारकरी सेनेची मागणी

varkari dindivarkari dindi

वारकरी दिंडी

राज्य सरकारनं प्रत्येक वारकरी दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विश्व वारकरी सेनेनं केली आहे. शासनाला जर वारकर्‍यांना आणि दिंडीला मदतच करायची असेल तर वारकर्‍यांच्या सोयी सुविधांवर तो पैसा खर्च करावा अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गणेश महाराज थेटे यांनी केली आहे.

हेही वाचा- विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी पार पडणार्‍या निवडणुकीला स्थगिती द्या; ठाकरे गटाची मागणी

वारकर्‍यांच्या सोयी सुविधांवर पैसा खर्च करावा

शासनाच्या २० हजार रुपये मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरस पूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. यामुळे निष्काम वारी पासून दिंडी आणि वारकरी दुरावणार आहे. त्यामुळं शासनाने प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये मदतीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गणेश महाराज थेटे यांनी केली आहे. शासनाला जर वारकर्‍यांना आणि दिंडीला मदतच करायची असेल तर वारकर्‍यांच्या सोयी सुविधांवर तो पैसा खर्च करावा जेणेकरुन वारकर्‍यांना वारी करणे सहज जाईल असे आवाहन गणेश महाराज थेटे यांनी केल आहे. त्यामुळे शासनाने तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

Rashtra Sanchar Digital:

View Comments (0)

whatsapp
line