“घूमर”चा ट्रेलर लाँच! ‘एक हात तुटला तर दुसऱ्या हातानं …’ अभिषेक आणि सैयामीची चर्चा

Ghumar Trailer lounch : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या आगामी बहू चर्चित ‘घूमर’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलिज करण्यात आला आहे. यात प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथेचा अनुभव येणार आहे. या ट्रेलब्लॅझिंग सिनेमॅटिक चित्रपटात अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. यामध्ये तो एका पॅराप्लेजिक खेळाडूला ट्रेन करताना दिसतोय. या खेळाडूची भुमिका सैयामी खेर साकारत असून ती चित्रपटात डाव्या हाताने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे.
ही कथा राहुल सेनगुप्ता आणि ऋषी वीरमानी यांच्यासोबत लिहिली आहे. हंगेरियन उजव्या हाताची नेमबाज कॅरोली टाक्स हिच्या कथेपासून प्रेरित आहे, ज्यात तिच्या दुसऱ्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिने डाव्या हाताने खेळून दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली होती. आर बाल्की लिखित आणि दिग्दर्शित घूमरमध्ये अभिषेक बच्चन, अंगद बेदी, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शिवेंद्र सिंग आणि इनवाका दास हे या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
घूमर” च्या ट्रेलरने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेणार असा विश्वास निर्मात्यांना आहे. ” घूमर” हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट असून त्यांनी “चीनी कम,” “पा,” आणि “पॅड मॅन” सारख्या प्रशंसित चित्रपटाच दिग्दर्शन देखील केलं आहे. आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित आहे “घूमर” 18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.