ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुपाली ठोंबरे यांचा संताप ठरणार पेल्यातील वादळ

आनंद परांजपे, सिद्धार्थ कांबळे आणि रूपाली चाकणकर या तिघांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी घेतली जात असताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटातच रूपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांना अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविला आहे.

परंतु महिला नेतृत्व , सभ्यता आणि आक्रमकता तरीही समन्वयातून मार्ग काढण्याचे कसब यामुळे रूपाली ठोंबरे यांच्यापेक्षा रूपाली चाकणकर यांचीच उमेदवारी निश्चित असल्याची भावना पक्षांमध्ये आहे.

रूपाली ठोंबरे पाटील या अनेकदा पक्ष बदल करीत अजित पवार गटामध्ये सामील झाल्या आहेत. त्या एक आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. परंतु, कुठल्याही गोष्टीवर आक्रमक होणे, प्रत्येक मुद्द्याच्या न्याय संघटनेने तर्कसंगत मांडणी करत ती गोष्ट तडीला नेणे हे गुण रूपाली ठोंबरे यांच्यामध्ये नाहीत. एक आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु, बऱ्याचदा त्या वितंडवादी दिसतात. पक्ष नेतृत्वाबाबत अनुचित शेरे मारणे याबाबत ही त्या मागील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कारकिर्दीमध्ये वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यांच्या रहिवासी परिसर असलेल्या पेठ परिसरात देखील त्यांचे फारसे प्रभुत्व नाही. नगरसेविका म्हणून देखील त्या निवडून येऊ शकत नाहीत, असे त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जाते त्यामानाने चाकणकर ताई या सध्या एक सभ्य आणि सुशिक्षित महिला नेत्या म्हणून पुढे येत आहेत. राज्यभर त्यांच्या वादळी सभा होत आहेत.ज्याप्रमाणे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिंदे शिवसेना गटाची महिला आघाडी सांभाळली, भाजपाची महिला आघाडी चित्रा वाघ यांनी सांभाळली त्याच पद्धतीने रूपालीताई चाकणकर या महिला नेतृत्वाचा चेहरा म्हणून अजित पवार यांच्या गटाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यांचा चेहरा हा चित्रा वाघ, डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याशी स्पर्धा करणारा आणि त्यांच्या बरोबरीने तोडीस तोड म्हणून उभा राहणार आहे. ही स्पर्धा रूपाली ठोंबरे यांच्या बाबत शक्य होणार नाही. याच्या पण पक्ष कार्यकर्त्यांना हे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्र संचारशी बोलताना सांगितले.

केवळ पदांचा हव्यास म्हणून वक्तव्य करणाऱ्यांना आणि पक्षश्रेष्ठ मोडणाऱ्यांना अजित पवार गटांमध्ये योग्य ती जागा दाखवली जाते. इतिहास असताना देखील रूपाली ठोंबरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून पक्ष शिस्तीची चौकट मोडली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये