शिंदेंच्या भाषणावेळी चक्क मंत्र्यांच्या डुलक्या, फोटो आले समोर…
मुंबई : (shinde group minister sleepin CM Shinde speech on) बीकेसीवर पार पडलेल्या शिंदे गटाची वेगळ्याच कारणामुळे राज्यात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेंचं भाषण दोन तासांहून अधिक वेळ लांबत गेल्याने शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना भाषणाच्या वेळी डुलकी लागल्याचे फोटे समोर आले आहेत. त्यामुळे शिंदे गट सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी शिंदे गटाचे प्रमुख प्रवक्ते दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना डुलकी लागल्याचे फोटो समोर आले आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उशीर झाला होता. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शिवाजी पार्कवरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतरच शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले. त्यांचे भाषण दोन पेक्षा आधीक वेळ लांबत गेल्याने व्यासपीठावर बसलेले केसरकर, देसाई हे नेते डुलकी घेताना दिसून आले. या माध्यमांवर राज्यभर चर्चेचा विषय होत आहे.