शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्द्यावरून राऊतांची फडणवीसांवर जहरी टीका, म्हणाले; “हि रंग बदलणारी औलाद…”;
![शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्द्यावरून राऊतांची फडणवीसांवर जहरी टीका, म्हणाले; “हि रंग बदलणारी औलाद...”; Raut And Fadnavis](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/Raut-And-Fadnavis--780x470.jpg)
मुंबई : (Vinayak Raut On Devendra Fadnavis) ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबील थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून हाती घेण्यात आली होती. या मुद्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जहरी टीका केला आहे. ते म्हणाले, फडणवीस ही भाजपची रंग बदलणारी राजकीय औलाद असून त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
”महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बील माफ करावे, शेतकऱ्यांकडून बील वसूल करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर ही भाजपची ही रंग बदलणारी राजकीय औलाद आता, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेत आहे.
दरम्यान, यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी त्यांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.