पुणे

संगीत महोत्सवामुळे पुणेकर झाले मंत्रमुग्ध

दगडूशेठ गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापनदिन

पुणे ः गण, गवळण, भारूड, पोवाडा आणि लोकगीतांपर्यंतचा प्रवास आणि गायनासोबतच अप्रतिम वाद्यवादनातून शाहीर ’नंदेश उमप रजनी’ यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सोबत गायनाच्या कार्यक्रमातून पुणेकरांना साद घातली. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सव; गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडत आहे.

जय जय रामकृष्ण हरि… च्या गजराने उमप यांच्या कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झाली. पठ्ठे बापूराव यांच्या ’आधी गणाला रणी आणला’ या शाहीर साबळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गणाने रसिकांना मोहीत केले. लतादीदींनी संगीतप्रेमींसाठी गायलेली गाणी ’आनंदघन’ मैफलीतून सादर करण्यात आली. हेमंत वाळुंजकर (गायन), राजेंद्र हसबनीस, उद्धव कुंभार, अनय गाडगीळ, दीप्ती कुलकर्णी, आदित्य गोगटे यांनी साथसंगत केली. केली. विनया देसाई यांनी निवेदन केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात चैत्राली अभ्यंकर व सहकार्‍यांचा ’आनंदघन’ हा कार्यक्रम पहिल्या सत्रात पार पडला. तर, ’नंदेश उमप रजनी’ हा शाहीर नंदेश उमप व सहकार्‍यांचा कार्यक्रम दुसर्‍या सत्रात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये