इतरताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
संजय राऊतांवर ईडीने कारवाई केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांचे अलिबाग मधील ८ फ्लॅट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधी पक्ष भाजपाकडून संजय राऊतांवर निशाणा साधण्यात येत आहे. यासंदर्भात आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यांवरील ईडीची कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली आहे.’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.