इतरक्राईमताज्या बातम्यामनोरंजन

टायगर श्रॉफ, सनी लिओनीसह 14 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Bollywood – सध्या बॉलिवूडचे (Bollywood) अनेक प्रसिद्ध कलाकार अडचणीत सापडले आहेत. ईडीकडून (ED) मुंबईसह राज्यातील 39 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी देखील ईडीच्या रडारवर आहेत.

ईडीला महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या (Mahadev Online Betting App) माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असल्याचा संशय होता. याप्रकरणी ईडीनं मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ईडीकडून मुंबईसह कोलकाता, छत्तीसगड, रायपूर, भोपाळ अशा राज्यातील 39 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमध्ये तब्बल 417 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अनेक बॉलिवूडकरांचा समावेश आहे. परदेशात महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून काही इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं होतं. तसंच या इव्हेंटसाठी सेलिब्रिटींना मानधन रोख रकमेतून देण्यात आलं होतं. तसंच हे पैसे दोन नंबरचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बॉलिवूडच्या 14 सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. यामध्ये टायगर श्रॉफ, सनी लिओनी, नेहा कक्कर, राहत फतेही अली, कृष्णा अभिषेक या सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. त्यामुळे आता या सेलिब्रिटींना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये