Top 5अर्थताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबई

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात; व्यावसायिकांना दिलासा

देशातील नागरिक सगळीकडूनच महागाईची झळ सोसत आहेत. मात्र, सण – उत्सवांच्या काळात व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज ( १ सप्टेंबर) पासून १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींत मोठी कपात करण्यात आली आहे. या दरकपातीमुळे व्यावसायिकांनाच दिलासा मिळणार आहे, १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडर आगोदरच्या दरातच मिळणार आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरसाठी खिशाला कात्री लागलेलीच राहणार आहे, त्यात कसलाही दिलासा मिळालेला नाही.

१९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. हा सिलिंडर आता दिल्लीत ९१.५० रुपये, कोलकत्त्यात १०० रुपये आणि मुंबईत ९२.५० रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे. त्यामुळे नव्या दरानुसार हा सिलिंडर दिल्लीत १८८५ रुपये, कोलकत्त्यात १९९५ रुपये तर मुंबईत १८४४ रुपयात मिळणार आहे.

त्याचबरोबर घरगुती वापरासाठी असलेला गॅस पूर्वीच्याच किमतीत मिळणार आहे. त्यांचे दर दिल्लीत १०५३ रुपये, कोलकत्त्यात १०७९ रुपये तर मुंबईत १०५२ रुपयात मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये