Top 5अर्थक्राईमदेश - विदेशमहाराष्ट्रमुंबई

बनावट बिले वापरून 41.67 कोटी मिळवणारा पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (GST)विभागाने गुरुवारी मुंबईतील एका ऑपरेटरला 231.49 कोटी रुपयांची बनावट बिले वापरून 41.67 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याबद्दल अटक केली. आरोपी तीन कंपन्या ऑपरेट करत होता.

ब्रिजेश वनितलाल शहा (48) असे आरोपीचे नाव आहे. राज्य जीएसटी विभागाने कर चुकवणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात केलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्रिजेश शहा हा ओम इम्पेक्स, ब्रिजेश्वरी एंटरप्रायझेस आणि चेतना मेटल्स एलएलपी या तीन कंपन्यांच्या ऑपरेटर आहे. 231.49 कोटी रुपयांच्या खोटी बिले बनवली असून बिलांच्या माध्यमातून 41.67 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC)मिळवले असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये