
४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान जॉर्ज जिमी इनडोअर स्टेडियम तिरुअनंतपुरम केरळ येथे होणाऱ्या चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेसाठी धायरीच्या स्वामिनी रविंद्र जोशी हिच्यासह ४६ खेळाडूंची भारतीय सिलेबम संघामध्ये निवड करण्यात आली आहे. पुणे भारत स्काऊट अँड गाईड ग्राउंड सदाशिव पेठ, ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन धनकवडी, पंडितराव आगासे स्कूल लॉ कॉलेज रोड, वनाज परिवार विद्यामंदिर कोथरूड, डी.ई. एस. इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल टिळक रोड, महेश बालभवन कोथरूड, धर्मवीर संभाजी महाराज व्यायाम शाळा गोकुळ नगर इत्यादी ठिकाणी मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले, प्रशिक्षक दिलीप आव्हाळे, शक्तीप्रसाद पात्रा, मोहक बर्वे, अवंती सकुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंना मान्यवर राजकीय व्यक्ती, उद्योजकांनी मदत केली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंची नावे
स्पंदन शहा, शिवम कोठावळे, कबीर पैठणकर, अद्वैत शिंदे, अर्णव घोडके, विवान चक्के, प्रभव नेरकर कार्तिक काळे, चैतन्य रसाळ, श्रीपादराज रायरीकर, आयुष शिंदे, राजवीर सुतार, देवांश चव्हाण, सोहम तावरे, प्रसन्न कंधारे, लोकेश देवकर, प्रितेश राठोड, प्रणव पांढरे स्वरूप सणस, वेदांत अंकले, समर्थक वर्धेकर, महादेव पवार, मल्हार सोनवणे, शार्लव यादव, अद्वैत बनकर, शंतनू उभे, भूषण बोडके, अथांग गोणेकर, ओम संगपुल्लम, शिवम पोटे, सिद्धी संपगावकर, स्वानंदी कोडगुले, आराध्या पावटेकर, चिन्मयी कुलकर्णी, अन्वी मेढेकर, प्रांजल कापसे, देवश्री महाले, मुद्रा बोडके, स्वामिनी जोशी, ज्ञानेश्वरी मोरे, ईश्वरी भोकरे, मानसी भिसे, ब्रह्माक्षी मस्के, मनवा कुलकर्णी, संतोषी कोत्तावार, अवनी देशमाने, आशना चव्हाण. स्वामिनी जोशी हिने आतापर्यंत राज्यस्तरापर्यंत झालेल्या सिलंबम स्पर्धांमध्ये ३ गोल्ड मेडल, ३ सिल्वर मेडल आणि २ ब्रांझ मेडल मिळवले आहेत.