ताज्या बातम्यापिंपरी चिंचवड

मालमत्ता करातून पिंपरी चिंचवड महापालिका मालामाल; नऊ महिन्यांत तब्बल ५३८ कोटी जमा

पिंपरी चिंचवड महापालिकेला शहरातील मालमत्ताकराद्वारे ५४० कोटी रुपयांचा महसूल प्रात्प झाला आहे एकूण तीन लाख ७९ हजार मलमत्ताधराकांनी हा करभरा केला आहे. त्यात सर्वाधिक ३६२ कोटी ७४ लाख रुपयांची बिले त्यांनी ऑनलाइन भरली आहेत.

महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे, शहरातील ६ लाख ३३ हजार २९४ मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी सर्वाधिक ५ लाख ४१ हजार १६८ निवासी मालमत्ता असून ५७ हजार ७३३ मालमत्ता बिगरनिवासी आहेत. औद्योगिक ४ हजार ५६३, मोकळ्या जमिनी ११ हजार ३२३, मिश्र १६ हजार १ आणि इतर २ हजार ५०६ मालमत्ता आहेत. आर्थिक वर्षातील(१ एप्रिल ते २८ नोव्हेंबर)पहिल्या ऩऊ महिन्यात एकूण ५४० कोटी रूपयांचा मालमत्ताकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आतापर्यंत एकूण ३ लाख ७९ हजार मालमत्ताधारकांनी बिलभरणा केला आहे. थकबाकीची रक्कम ८९ कोटी ८० लाख रूपये आहे. तर, ४४७ कोटी ६१ लाख रूपये ही चालू मागणी आहे. त्यात ३६२ कोटी ७४ लाख रूपये ऑनलाइन जमा झाले आहेत.

आयटीजीएस आणि एनईएफटीद्वारे ४२ कोटी, रोखीने ४१ कोटी ६६ लाख तर धनादेशाद्वारे ३७ कोटी ९७ लाख रूपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. एकूण ३५ कोटी ४३ लाखांचे समायोजन करण्यात आले आहे. ८३ कोटी ६० लाखांचा सर्वाधिकमालमत्ताकर वाकड विभागीय कार्यालयाकडे जमा झाला आहे. पाठोपाठ ५० कोटी ६७ लाखांचा कर थेरगाव कार्यालयात तर, चिखलीतून ४२ कोटी ७३ लाख, पिंपरीगावातून ३७ कोटी ८२ लाख आणि भोसरीतून ३७ कोटी ६२ लाख रूपयांचा कर जमा झाला आहे. मागील वर्षी पहिल्या ९ महिन्यांत एकूण ६३३ कोटी रूपये जमा झाले होते. यंदा त्या तुलनेत कमी वसुली झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, एकूण ८६२ कोटी ७० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निवडणुका आचारसंहितेमुळे ती प्रक्रिया थांबली होती. तसेच, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाईही सुरू करण्यात येणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

आता लक्ष वसुलीकडे

कर संकलन विभागातील बहुतांश कर्मचारी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे करसंकलन विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. याचा परिणाम करवसुलीवर झालेला दिसून आला. गेल्या वेळेस महानगरपालिकेकडून मालमत्ताधारकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसूल करण्यात आले होते. मात्र, यावेळेस ते रद्द केल्याने ती रक्कम यंदा दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये