क्रीडाताज्या बातम्या

ना कोहली ना रोहित, सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो ‘हा’ खेळाडू, दिग्गजाची मोठी भविष्यवाणी!

नवी दिल्ली | Sachin Tendulkar’s Record Break – सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना ऐतिहासिक लॅार्डस क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. तसंच हा सामना इंग्लंडने जिंकला. यामध्ये माजी कर्णधार जो रुटने नाबाद ११५ धावांची खेळी करुन विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. जो रुटने या शतकी खेळीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करुन इतिहास रचला. रुटने न्यूझीलंड विरुद्ध झळकावलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक होते. त्यामुळे रूट आता विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या सर्वाधिक कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. तसंच कोहली आणि स्मिथ दोघांच्याही नावे २७ कसोटी शतकांची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने जो रूटबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णाधार मार्क टेलरने जो रुटची तुलना सचिन तेंडुलकरशी केली आहे. टेलरच्या मते, कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रम जो रुट सहज मोडू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने वैयक्तिक १५ हजार ९२१ धावांचा विक्रम रचलेला आहे. तसंच आजपर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही.

स्काय स्पोर्टसशी बोलताना मार्क टेलर म्हणाला की, मी गेल्या १८ महिन्यांपासून त्याला सतत फलंदाजी करताना बघितले आहे. सध्या तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॅार्ममध्ये आहे. तो कमीत कमी पाच वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्याकडून सहज मोडला जाऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये