पुण्यात 30 वर्षीय व्यक्तीकडून चार वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य; तिला फिरायला घेऊन गेला अन्…

पुणे | Pune Crime – पुण्यात (Pune) एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये एका 30 वर्षीय व्यक्तीनं चार वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी राजेश चोरगेला अटक केली आहे. या घटनेनंतर कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चार वर्षांची चिमुकली तिच्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी राजेश चोरगेनं तिला फिरायला नेतो असं सांगून सोबत घेऊन गेला. काही अंतरावर गेल्यानंतर एका सोसायटीच्या परिसरात लावलेल्या बसजवळ त्यानं पीडित बालिकेला नेलं. तिथे अंधारात त्यानं तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं.
यावेळी पीडित बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे आजोबा तिथे धावत गेले. त्यानंतर हे गैरकृत्य पाहताच चिमुकलीच्या आजोबांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसंच चिमुकलीच्या आजोबांनी आणि परिसरातील रहिवाशांनी आरोपी चोरगेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.