भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वात इतिहास घडवत विजय; श्रीलंकेविरुद्ध ३:0 ने मालिका जिंकली

IndvsSl 3rd ODI : मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर भारतीय संघाने देशाला गोड गिफ्ट दिलं आहे. श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा तिसरा सामना विराटच्या (Virat Kohli) दीडशतकी, गीलच्या शतकी खेळीने आणि सिराजच्या जबरदस्त गोलंदाजीने भारतीय संघाने तब्बल ३१७ धावांनी जिंकला आहे. हा विजय एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील इतिहास बनला आहे. यापूर्वी एवढ्या धावांनी कोणत्याही संघाचा पराभव एकदिवसीय सामन्यात केलेला नाही. तो आज भारतीय संघाने श्रीलंकेचा केला आहे. याबरोबरच २०२३ ची पहिली भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामना मालिका भारताने एकहाती म्हणजे ३:0 ने जिंकली आहे. लंकेचे दहन असेच या मालिकेतील भारताच्या कामगिरीचे वर्णन करता येईल. (A historic victory of india in ODI seriese against shri lanka with the best performance of virat kohli shubman gill, siraj and all Indian Cricket Team)
भारताने ठेवलेल्या ३९० धावांच्या डोंगराएवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अवघ्या ३७ धावात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला. नुवानिदू फर्नांडो आणि कर्णधार दासुन शनाका या दोघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. फर्नांडोने सर्वाधिक १९ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ गडी बाद करत त्याला साथ दिली.