ताज्या बातम्यामनोरंजन

“आई तू नको रडूस मी आहे ना…”; नम्रता संभेरावच्या मुलानं गायलं खास गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | Namrata Sambherao – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली काॅमेडी क्वीन नम्रता संभेराव (Namrata Sambherao) नेहमी चर्चेत असते. नम्रता संभेरावनं तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच तिला आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना तिच्या कुटुंबियांची उत्तम साथ मिळाली आहे. याबाबत तिनं एका इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये भाष्य देखील केलं होतं. आपल्या कामातून वेळात वेळ काढत ती कुटुंबासाठीही तितकाच वेळ देते. यादरम्यान नम्रतानं तिचा मुलगा रूद्राजचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नम्रतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रूद्राजचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या नव्या व्हिडीओमध्ये रुद्राज “एकटी एकटी घाबरलीस ना…” हे सुंदर मराठी गाणं गाताना दिसत आहे. आपला लेक गाणं गात आहे हे पाहून नम्रतालाही अश्रू अनावर होतात. तसंच व्हिडीओ शेअर करताना तिने भावुक संदेशही लिहिला आहे.

“हे गाणं जेव्हा म्हणते तेव्हा अक्षरशः कंठ दाटून येतो उर भरून येतो… आणि मग माझं इवलंसं लेकरू माझा रुद्राज म्हणतो आई तू नको रडूस मी आहे ना…” असं नम्रतानं म्हटलं आहे. लेकाचं गाणं ऐकून नम्रताला अगदी अश्रू अनावर होतात. नम्रताच्या लेकाच्या या गोंडस मुलाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये