‘अरे ट्रॅफिक काय असतं हे मला विचारा’, अभिनेत्री क्रांती रेडकरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई | मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी चाहत्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच क्रांती रेडकरने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांती सध्या रेनबो या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती लंडनमध्ये शूटींग करत होती. यावेळी तिने लंडनमधील आणि मुंबईतील ट्राफिकबद्दलचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे.
क्रांती रेडकर ही रेनबो चित्रपटाच्या निमित्ताने लंडनमध्ये शूटींग करत होती. यादरम्यान शूटींगच्या वेळी ती तिच्या एका मैत्रिणीला भेटायला गेली होती. बऱ्याच काळानंतर एकमेकांना भेटल्यानंतर त्यांनी एकत्र फिरायला जाण्याचा प्लॅन आखला. आम्ही लंडनच्या एका रस्त्यावरुन गाडी चालवताना माझी मैत्रिण सतत तिकडच्या ट्राफिकबद्दल तक्रार करत होती. त्यावर क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत क्रांती म्हणाली, “आम्ही लंडनच्या त्या रस्त्यावर गाडीने जात असताना आमच्या आजूबाजूला मोजून चार ते पाच गाड्या होत्या. काहीच ट्रॅफिक नव्हतं. वीक डे होता आणि भर पीक अवरमध्ये फक्त एवढंच ट्राफिक होतं. त्यावेळी तिची सारखी कुर कुर सुरु होती. किती ट्राफिक आहे, किती वेळ लागणार असं ती सतत म्हणत होती.”
त्यावर मी तिला म्हणाले की “तुला ट्रॅफीक बघायचं असेल ना तर आमच्याकडे ये कधी तरी जुहू सर्कलला. आमच्याकडे फक्त एकावर गाडी चढवू शकत नाही म्हणून नाहीतर लोकांनी ते ही केलं असतं.” अशा शब्दात क्रांती तिला मुंबईतील ट्राफिकबद्दल सांगते. यावेळी तिने ट्राफिकचा सांगितलेला विनोदी किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर करत क्रांतीने त्याला एक हटके कॅप्शन देखील दिलं आहे. “अरे ट्राफिक काय असते हे कोणी मला विचारा. माझे माझ्या देशावर आणि शहरावर खूप प्रेम आहे. त्याच्यासारखे इतर कोणतेही शहर किंवा देश नाही. नाहीतर त्यावरुन काही लोक प्रवचन सुरु करतील. सो प्लीझच,” असं क्रांतीनं म्हटलं आहे.