‘केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हाॅस्पिटलमध्ये! तिच्या एका निर्ययामुळे चाहत्यांची चिंता वाढली..
Adah Sharma Announce Break : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्माची प्रकृती अचानक बिघडली आहे. मात्र आता तिने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं तिच्या चाहत्यांना तिची काळजी लागली होती. आता अदानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, या पोस्टमध्ये अदाने आपण काही दिवस कामातुन ब्रेक घेणार असल्याचं सागितलं. तिला पित्ताची समस्या उद्धभवल्यामुळे तिला अस्वस्थ वाटतं होतं. औषधांच्या परिणाम तिच्या त्वचेवर झाला आहे. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेयर करत ‘ट्रिगर वॉर्निंग: ग्राफिक इमेज अहेड’ असं लेबल लावतं तिने काही फोटो शेयर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमचे सर्वांचे आभार… मला अनेकांचे मॅसेज आले आणि काही लोक जे बऱ्यात वर्षांपासून भेटलेही नाहीत त्यांनीही माझ्या तब्येतीची विचरणा केली. त्वचेवर पुरळ येण्याची भीती वाटत असल्यास स्वाइप करू नका. फोटो थोडी भितीदायक आहेत. पण मला वाटले की फक्त सौंदर्याची फोटो Instagram वर शेअर करू नयेत.’ तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.