BCCI चा मोठा निर्णय! कोहली-शर्माला टी-20 संघातून दाखवला बाहेरचा रस्ता?

नवी दिल्ली : (BCCI Big Decision) भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. याआधी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची संघात निवड होणार नाही.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की, ‘दुर्दैवाने न्यूझीलंड मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड किंवा विचार केला जाणार नाही. हे त्यांना संघातून बाहेर फेकण्यासाठी किंवा कशासाठी केले जात नाही, आम्हाला वाटते की भविष्यासाठी एक चांगला संघ तयार करणे आवश्यक आहे. बाकी निवडकर्ते काय निर्णय घेतात ते बघितले जाईल.
विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेचा भाग असतील परंतु हे दोन खेळाडू 27 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत खेळणार नाहीत.