ताज्या बातम्यामनोरंजन

चक्क अजय देवगणने उडवली काजोलची खिल्ली, शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मुंबई | Ajay Devgan Share Kajol’s Video – बाॅलिवूडची सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती जोडी म्हणजे अजय देवगण आणि काजोल. काजोलने वडिलांच्या विरोधात जाऊन अजय देवगणसोबत लग्न केलं होतं. पण आज त्यांची जोडी बॉलिवूडमधील हिट कपलपैकी एक आहे. ते दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते नेहमी त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतंच अजय देवगणने पत्नी काजोलचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

अजय देवगणने जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी काजोल आणि अजय दोघेजण काॅफी पिताना दिसत आहेत. यावेळी काजोल कोणत्यातरी विषयावर बोलताना दिसत आहे. तर अजय हा शांतपणे तिचं बोलणं ऐकताना दिसत आहे. यादरम्यान अजयच्या चेहऱ्यावरचे हावभाव फार बोलके असल्याचं दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे अजयने काजोलची खिल्ली उडवली आहे.

https://twitter.com/ajaydevgn/status/1548902647008096257

अजयने ही पोस्ट शेअर करत हटके कॅप्शन देखील दिलं आहे. “आज आणि दररोज जागतिक श्रवण दिन साजरा करत आहे,” असं त्यानं या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटलं आहे. तसंच त्याच्या या मजेशीर पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये